उद्देश पत्रिका घटनेचा सरनामा -डॉ तक्षशिल सुटे
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा व्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन येथील सभागृहात २६ नोव्हेंबर २१ रोजी भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात संविधान पुस्तकाच्या पुजनाने झाली व त्या नंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तक्षशिल सुटे यांनी केले. संविधानाची निर्मिती कशी झाली, सविधानाने भारतीय नागरिकांला समसमान संधी कशा उपलब्ध करून दिल्या यावर अतिशय सुंदर असे भाष्य केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. अरविंद ढोके. यांनी अतिशय मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले. समाजामध्ये विविध स्तरांमध्ये असणारा भेदाभेद सविधानाने दूर केला आहे. भारतीय संविधान हा भारतीय इतिहासातील महान ग्रंथ आहे. राष्ट्रीय सेवा योजने प्रेमाणेच इतर समाजोपयोगी प्रकल्पाची सुरुवात आनंदवनातून झाली असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य राधा सवाने यांनी केला. संविधान उद्देशिकेचे वाचन आपण रोज केले पाहिजे व त्यानुसार आचरण केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश गजभिये. यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. दिनेश लोखंडे. यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक वृंद विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांचे मार्गदर्शन लाभले.