हत्या प्रकरणात केली पोलिसांनी चार आरोपीला अटक
मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे
वणी :- निलेश चौधरी हा युवक दिनांक २७ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाला होता व त्याचा मृतदेह दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास रासा जवळील फुलोरा जंगल परिसरात गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे निलेशची हत्या की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांपुढे उभा होता. पोलीसांना तपासाअंती आज दिनांक १६ सप्टेंबर गुरुवारला हत्या असल्याचे स्पष्ट झाले असता चार आरोपीसह एका विधिसंघर्ष बालकाला अटक करून ताब्यात घेतले आहे.
सविस्तर माहिती अशी आहे की दिनांक २७ ऑगस्टला निलेश सुधाकर चौधरी (वय ३२) राहणार रासा येथील आपल्या घरून बेपत्ता झाले असल्याची तक्रार वणी पोलिसात दिनांक २८ ऑगस्टला सायंकाळी देण्यात आली. दिनांक २९ ऑगस्टला सकाळी १० वाजताच्या सुमारास निलेशचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत रासा येथील फुलोरा जंगलात आढळून आला. मृतकाची बहिण सीमा मोहन गाडगे हिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम ३०२, ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वणी पोलिसापुढे आत्महत्या की घातपात असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी तपास यंत्रणेला गती देत चार आरोपीसह एका विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले व चौकशी दरम्यान हत्या केल्याचे निष्पन्न झाले पुढील तपास सुरू आहे.