ताज्या घडामोडी

शास्त्री विद्यालयात मोफत सायकल वाटप;प्रा टेकाळे यांचा कार्याचा गौरव

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आष्टी (ता.परतूर) येथील लालबहादुर शास्त्री विद्यालयात ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या मुलींसाठी मानव विकास अंतर्गत 56 सायकल चे वाटप संस्थेचे सचिव तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लॉयन्स क्लब चे संस्थापक अध्यक्ष मनोहरराव खालापूरे, गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे,गट समन्वयक कल्याण बागल, केंद्र प्रमुख राम सोळंके,मानव विकास तालुका समन्वयक हनुमंत काटमोडे, मुख्याध्यापक लव बिरादार,राष्ट्रवादी युवक काँगेसचे तालुकाध्यक्ष ओंकार काटे,ओ.बी.सी. सेलचे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाचे प्रा. प्रमोद टेकाळे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे संस्थेचे सचिव कपिल आकात यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सेवागौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास कालिदास जगताप, वसंत धोंडगे,प्रा.आण्णा बांडगे,प्रा.पाचपोळ,प्रा.बिडवे,प्रा.जोशी व सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक,विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close