ताज्या घडामोडी

ब्रह्माकुमारी मीरादीदी यांना संत गाडगेबाबा महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शहरात गेल्या २१ वर्षापासून जनसामान्यांमध्ये आपल्या अलौकिक स्नेहाच्या आधारे आत्मिक प्रेम देणाऱ्या,नीती मूल्य जपवणूक शिकवणाऱ्या,महिला जागृती,महिला सशक्तिकरण,तणाव मुक्ती,व्यसनमुक्ती, शाश्वत योगिक शेती,राजयोग मेडिटेशन,अशा विविध विषयांवर ज्ञानदानाचे व अन्नदान अविरत कार्य करणारे व्यक्तिमत्व ब्रह्मकुमारी मीरादीदी (सोनपेठ सेंटर इन्चार्ज)यांना विद्यानिकेतन सामाजिक संस्था वाई,जिल्हा सातारा यांच्या वतीने राष्ट्रीय संत प्रेरणा पुरस्कार सोहळा २०२६ या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रसंत प्रेरणा गौरव पुरस्कार संत गाडगेबाबा समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार सोहळा दिनांक १४ जून रविवार रोजी सकाळी १० वाजता रमेश गरवारे सभागृह,लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई,जिल्हा सातारा.या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्री.शंकर घनश्यामदास अंदानी (मातृभक्त आचार्य सीए प्राचार्य.),प्रमुख पाहुणे किरण भोसले (संचालक यशश्री अकॅडमी वाई),डॉ.श्री.अशोक गोविंद नगरकर (ज्येष्ठ शास्त्रज्ञ डीआरडीओ पुणे)इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमधे ब्रह्माकुमारी मीरादीदी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.त्याग तपस्या सेवा समर्पण वृत्ती याचे मूर्ती मंत उदाहरण म्हणजे ब्रह्माकुमारी मीरादीदी,विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था वाई जिल्हा सातारा यांच्यावतीने समाजातील तळागाळातील समाज उपयोगी कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार दिला जात असल्याचे मीरादीदी यांनी आपले मनोगत मध्ये सांगितलेसंत गाडगेबाबा महाराज समाज भूषण पुरस्कार हा केवळ माझा एकटीच मानसन्मान नसून संपूर्ण ब्रह्माकुमारी विद्यालयाचा मान सन्मान आहे.व ईश्वरीय कार्याची धुरा सांभाळत असताना समाजातील लहान वयापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सेवा करण्याची सुवर्णसंधी मला लाभलेले आहे.अशीच सेवा आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने व शिव परमात्मा कृपेने माझ्या हातून समाज उपयोगी कार्य घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेन व आपल्या सर्वांचे कायम दुवा आशीर्वाद पाठीशी घेऊन भावी जीवनातही आपल्या सर्वांच्या सहकार्याने अजून चांगले कार्य करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल अशी ग्वाही मीरादीदी यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close