ताज्या घडामोडी

खेर्डा महादेव पाथरी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शिवशंकर यात्रा महोत्सव निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खेर्डा महादेव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी श्री ह भ प चांगदेव महाराज काकडे कंडारीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सदर सप्ताहाची सांगता झाली. सदर सप्ताहामध्ये मागील आठ दिवसापासून श्री ह भ प किशोर महाराज सूर्यवंशी, दीपक महाराज बादाडे, अॅड. नारायण महाराज पालमकर, नाना महाराज पुरुषोत्तमपुरीकर, प्राध्यापक विजय महाराज गवळी, जलाल महाराज सय्यद व भागवत महाराज बादाडे इत्यादी महाराजांची सुश्राव्य कीर्तने झाली. तसेच राम महाराज पिंपळेकर यांच्या मंगल वाणीतून शिव महापुराण कथा संपन्न झाली. शिवशंकर यात्रा महोत्सवानिमित्त गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून काल्याचे कीर्तन झाल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने गावातील मुख्य नागरिक मालीपाटील श्री अभिजीत भैया आम्ले यांचे शुभ हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसाद झाला, दुपारी तीन ते पाच या वेळेत नवसाच्या गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मुकादम श्री माणिक आम्ले व गावातील तरुणांच्या नियोजनात संपन्न झाला. रात्री नऊ वाजता श्रींच्या महापालखीची टाळ मृदंग ढोल ताशा व वारकऱ्यांच्या उपस्थितीत जंगी मिरवणूक काढण्यात आली. महापालखी गावातील मारुती मंदिरात गेल्यानंतर तेथे श्री ह भ प विष्णु महाराज बांडे यांचा सांप्रदायिक सोंगाच्या भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला. भारुडाच्या माध्यमातून बांडे महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाव अभियान व व्यसनमुक्ती विषयी मार्गदर्शन केले. तसेच दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत गावातील प्रतिष्ठित श्री आबासाहेब आम्ले यांचे नियोजनात निकाली कुस्त्यांची दंगल झाली. यात्रा महोत्सवात पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. अशी माहिती गावातील प्रतिष्ठित श्री दामोदर आम्ले यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close