जीवन खूप सुंदर आहे जबरदस्तीने जगू नका, जबरदस्तपणे जागा- ब्रह्माकुमारी मीरा दीदी

ज
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 26जुलै 2026 रविवार रोजी गुरू कांच बसवेश्वर मठ संस्थान पाथरी या ठिकाणी ऐतिहासिक दिवस कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून
काशिनाथ महाराज पाथरी मठ संस्थानचे संचालक यांच्या मार्गदर्शनांतर्गत गुरुपौर्णिमेच्या निमित्त अखंड शिवनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता
जीवन खूप सुंदर आहे

याविषयी मार्गदर्शन ब्रह्माकुमारी मीरा दीदी यांनी केले , मार्गदर्शन करत असताना मीरा दीदी (सोनपेठ) यांनी मनोरंजनात्मक खेळांच्या आधारे उपस्थित भाविक भक्तांना उत्साही जीवनाचा मार्ग खूप सहज आहे हे शिकवले. व आपण सर्वजण एक ईश्वर ची मुल सृष्टी वरील सुंदर रचना आहोत.अशी अनेक उदाहरणं देऊन दीदी नी भाविक भक्तांना आपल्या विचाराने मंत्रमुग्ध केले .परमात्मा संदेश ब्रह्माकुमारी सीमा सातोना यांनी दिला तसेच पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहिले होते .

त्यांच्या कडून व्यसनमुक्ती प्रतिज्ञा योगिता बहेंन यांनी करून घेतली व कार्यक्रमासाठी उपस्थित शांता बहेन यांनी ध्यान धारणा मनुष्य जीवनात खूप गरजेचे असल्याचे सांगितले व आभार व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.काशिनाथ महाराज यांनी केले व पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने सहभागी भाविक भक्तासाठी महाप्रसाद वितरण करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.









