ताज्या घडामोडी

वंचीत बहुजन आघाडीचा मुल तहसील कार्यालयावर धडक मोर्चा व धरणे आंदोलन

वंचितचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल

मूल तालुक्यातील आदिवासी व गैर आदिवासी जबरान जोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात मुल तहसील कार्यालयसमोर अन्यायग्रस्त जबरान जोत शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले.
मूल तालुक्यात असंख्य जबरान जोत शेतकरी आहेत. मागील कित्येक वर्षापासून शेतकरी शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. वनजमिनीचे पट्टे मिळावे म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे दावे सुद्धा टाकलेले आहेत. परंतु वनविभागाचा व प्रशासनाचा दिवसेंदिवस शेतकऱ्यांवरचा अत्याचार वाढत आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अन्यायाला घेऊन मुल तालुक्यातील शेतकऱ्यांनी राजु झोडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
धरणे आंदोलनात वनविभागाच्या शेतकरीविरोधी धोरणाला घेऊन तीव्र निदर्शने व नारेबाजी करण्यात आली व पुढील मागण्या मागण्यात आल्या. वनहक्क कायद्यानुसार आदिवासी व गैर आदिवासींना जमिनीचे पट्टे देण्यात यावे.वन विभागाचा शेतकऱ्यांवरचा वाढता अन्याय बंद करण्यात यावा. जबरान जोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यात यावा. तीन पिढ्यांची जाचक अट रद्द करण्यात यावी अशा मूलभूत मागण्यांना घेऊन निवेदन देण्यात आले.
सदर धरणे आंदोलनात तालुक्यातील असंख्य जबरान जोत शेतकरी उपस्थित होते. धरणे आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी केले तर मोर्चामध्ये वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गावतुरे, महासचिव जयदीप खोब्रागडे, संपत कोरडे, सचिन पावडे, रोहित बोबाटे, कविता गौरकर, मधुकर उराडे तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close