ताज्या घडामोडी

सोशल मीडिया ची कमाल, अवघ्या तीन तासात मिळाला नवीन विद्युत पोल सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार

महातपुरी वासियात समाधान

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

सोशल मीडियावर अनेक पोस्ट येत असतात. पण त्या पोस्टची व्यवस्थित दखल घेतली तर काय होऊ शकतो याचा प्रत्यय रविवारी महातपुरीवासियांना आला ..परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी या पोष्टची दखल घेतल्याने रविवारी अवघ्या तीन तासात नवीन पोल बसविण्यात आला. यामुळे महातपुरीवाशिया मधून समाधान व्यक्त केले जात आहे.
महातपुरी तालुका गंगाखेड येथील एका चौकात विद्युत पुरवठा करणारा पोल गंजला असून तो पडून संभाव्य अपघात होऊ शकतो आणि याकडे कोणीतरी लक्ष द्यावे अशी पोस्ट गावातील युवा कार्यकर्ते शेख अमजत यांनी व्हाट्सअप वरील एका ग्रुपवर केली होती. या पोस्ट ची परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी तात्काळ दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. महावितरण अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याने शेवटी प्रभारी तहसीलदार प्रमोद धोंगडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून महातपुरी मधील हकीगत सांगितली. तहसीलदार साहेब यांनी याची तात्काळ दखल घेत महावितरणचे अभियंता भसारकर यांना तात्काळ नविन पोल बसवण्याचे आदेशित केले. सकाळी नऊ वाजता व्हाट्सअप वर पोस्ट पडताच बारा वाजेपर्यंत नवीन पोल घेऊन महावितरणचे वाहन गावात आल्याने ग्रामस्थ अचंबित झाले. याकामी पुढाकार घेणारे सखाराम बोबडे पडेगावकर ,सामाजिक कार्यकर्ते मुंजाभाऊ लांडे, तहसीलदार प्रमोद धोंगडे ,महावितरणचे कर्मचारी व पोस्ट करणारे अमजद शेख त्या सर्वांचे ग्रामस्थांनी कौतुक केले. यावेळी सतीशभाऊ शिंदे, स्वप्नील सलगर, बजरंग इंगळे, नारायण गिरी, माऊली मुळे ,वामन ख, सोमेश्वर खवडे, शेख अमजद, दिनानाथ घिसडे, प्रभाकर इंगळे, शेख मोहसीन, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष जानकीराम वाळवंटे, मुक्तिराम ख, महेश कवडे, निवृत्ती मुळे आदीसह ग्रामस्थ, महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. तात्काळ नवीन पोल मिळाल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close