ताज्या घडामोडी
मा.निलेश काटे यांची सरपंच सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणीवर बिनविरोध निवड
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
सातारा जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस निलेश काटे यांची महाराष्ट्रात प्रथम नोंदणीकृत व सरपंचाच्या विविध मागण्यासाठी पाठपुरावा करणारी व समस्या सोडणारी महाराष्ट्र राज्यातील प्रथम नोंदणीकृत संघटना असुन या संघटनेच्या माध्यमातून निलेश काटे यांना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांना या संघटनेच्या माध्यमातून माण व इतर तालुक्यातील
सरपंचाच्या समस्या सोडवण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून मदत होणार आहे. त्यामुळे त्यांचे विविध सामाजिक संघटना व राजकीय संघटना व विविध गावातील सरपंचापकडून अभिनंदन होत आहे.