“कृषीकन्यांनी केले शास्त्रीय बिजोत्पादनासाठी बियांचे वर्गीकरण”
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन, वरोरा येथील सातव्या सत्रातील विद्यार्थीनींनी ग्रामीण कार्यानुभव विषया अंतर्गत चरुरखटी येथे शास्त्रीय बिजोत्पादनासाठी बियांचे वर्गीकरण करुन दाखविले. शास्त्रीय पद्धतीने निर्माण केलेले सुधारित वाणांचे बियाणे, उत्तम गुणवत्तेचे, शुद्ध, कोणतेही भेसळ नसलेले, कोळरोग मुक्त, ठराविक टक्केवारी इतकी उगवण क्षमता असलेल्या बियांनांची निर्मिती म्हणजे बिजोत्पादन होय.
विद्यार्थीनींने गावातील गुरूदेव मंदिराच्या आवारात शेतकरयांना बियांनांचे वर्गीकरण मूलभूत बियाणे, पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे, सत्यवर्धक बियाणे यांची थोडक्यात माहिती पटवून सांगितली. जेणेकरून बाजारातून बियाणे खरेदी करताना मदत होईल.
या प्रात्याक्षिकामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थीनी कु.संचेती सोनुले, कु. श्रेया राऊत, कु.पल्लवी रामटेके, कु. दिव्या राणे, कु. अंजली पिंपळकर व कु.आचल रोशनखेडे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहास पोतदार सर, प्रभारी डॉ.रामचंद्र महाजन सर, कार्यक्रम समन्वयक श्री.एस.एन. पंचभाई सर, कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदिप आकोटकर सर आणि विशेष तज्ञ डॉ.अश्विनी मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्याक्षिक पार पडले.