वीजबिल कमी करण्याच्या मुद्द्यावर सरकारने फसविले. महाविकास आघाडी म्हणजे घनचक्कर सरकार- आम आदमी पार्टी चा आरोप
चिमूर विधानसभेत ठिकठिकाणी आम आदमी पार्टी चे घंटानाद आंदोलन. सरकारच्या वचननाम्याची होळी.
मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे
राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी श्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला ३०% वीज स्वस्त करण्याचे वनच दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून हे सरकार सत्तेवर आले आहे. महाराज जनतेला जे वाचन द्यायचे त्याची पूर्ती करायचे खोटे बोलणाऱ्याला कडक सजा द्यायचे. परंतू, मा. श्री उद्धव ठाकरे यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावर खोटे वचन देवून जनतेची फसवणूक केली आणी वरून विजेचे दर वाढवून धोकाधडी केली आहे. वीजबिल कमी करण्याच्या मुद्द्यावर सरकारने जनतेला फसविले आहे. महाविकास आघाडी म्हणजे घनचक्कर सरकार आहे, एकमेकांवर जबाबदारी ढकलून जनतेची दिशाभूल केली जात आहे यासाठी आम आदमी पार्टी राज्यव्यापी ‘घंटानाद’ आंदोलन करीत असून चिमूर विधानसभेतील चिमूर आणी नागभीड तालुक्यात आप चे चंद्रपुर ज़िल्हाप्रमुख श्री सुनिलजी मूसळे यांच्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन करून सरकारच्या वचननाम्याची होळी करण्यात आली.
वीजमंत्री श्री नितीन राउत यांनी मंत्री पदाचे सूत्र स्वीकारल्यानंतर आम आदमी पार्टी च्या दिल्ली सरकारच्या धर्तीवर राज्यातील जनतेला १०० युनिटपर्यंत वीजबिल मोफत देण्याचे जाहीर केले होते व कोविड दरम्यान त्यांनी वीजबिल माफी संदर्भात मंत्रिमंडळात निर्णय घेवून राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविल्याचेही जनतेला सांगितले होते. महत्वाची बाब म्हणजे देशात सर्वात महाग वीज विकणारे सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार आहे. दिल्लीत २०० युनिट पर्यंत मोफत, ४०० युनिट पर्यंत ५०% दराने आणी सर्वात जास्त उपयोग करणाऱ्या ग्राहकांना दर रु. ६.५० प्रती युनिट दर आहेत. तामिळनाडू मध्ये १०० युनिट करिता शुल्क आकारले जात नाही.
एकूणच महाराष्ट्र सरकार रु. २.५० प्रती युनिट दराने तयार होणारी वीज राज्यात रु. ११ ते १६ प्रती युनिट प्रमाणे जनतेला विकली जाते म्हणजेच राज्य सरकार सावकारी करीत असल्याचे सिद्ध होत आहे असा आरोप या प्रसंगी आप तर्फे करण्यात आला. या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी आम आदमी पार्टी चे आदित्य पिसे, विशाल इंदोरकर, मंगेश शेंडे, , विशाल बारस्कर, सुदर्शन बावणे ,त्रिलोक बघमारे, कैलास भोयर, विलास दिघोरे, पंकज शंभरकर , समिधा भैसारे, छबुताई नन्नावरे , ज्योती बावणकर ,वर्षा पेटल, वंदना घोनमोडे, लिलाताई गोटे उपस्थित होते.