आमदार गुट्टे यांच्या हस्ते खादगाव येथे ८१ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक ११ जुलै रविवार रोजी गंगाखेड तालुक्यातील आदर्श गाव मौजे खादगाव येथे विविध योजनेतून आणलेल्या ८१ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते संपन्न झाले.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० मध्ये मौजे खादगाव ग्रामपंचायत बिनविरोध निघाली असल्याकारणाने आमदार गुट्टे यांनी घोषित केल्या प्रमाणे सदरील ग्रामपंचायतीस आमदार स्थानिक विकास निधीमधून सांस्कृतिक सभागृह बांधकामाकरिता २५ लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला. तसेच जिल्हा नियोजन समितीकडून व्यायाम शाळा बांधकाम करिता ७ लक्ष रुपये, पेव्हर ब्लॉक बसविण्याकरिता २९ लक्ष रुपये,बंदिस्त नाली बांधकामाकरिता ५ लक्ष रुपये,स्मशानभूमी पाणीपुरवठा करण्याकरिता ५ लक्ष रुपये व गावठाण मध्ये नवीन डीपी बसण्याकरिता १० लक्ष रुपयांचा विकास निधी, अशा एकूण ८१ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जि.प. सदस्य किशनराव भोसले,राजेश फड, गंगाखेड विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके, पंचायत समिती सदस्य मगर पोले, नितीन बडे, नगरसेवक सत्यपाल साळवे, गंगाखेड तालुका अध्यक्ष शिवाजी पवार सरपंच सावित्री राजेश फड, ग्रा.पं.स. नाना बळीराम फड, बापूराव शिंदे, भगीरथ फड, वैजनाथ वाव्हळे, श्रीवंत फड, भागवत दहिफळे, अंगद फड, उत्तम वाव्हळे तसेच दिलीप फड, गोविंद फड यांच्यासह गावकरी उपस्थित होते.