ताज्या घडामोडी

” उच्चशिक्षित व्हावे”- सौ. भावनाताई नखाते

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

21 व्या शतकात मुलींसाठी सर्वच क्षेत्रातील दारे उघडे आहेत. कुटुंबातूनही मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत आहे, त्यामुळे मुलींनी मागे न राहता आपल्या आवडीप्रमाणे सर्व क्षेत्रांमध्ये पुढाकार घेऊन उच्च शिक्षण घ्यावे व यश संपादन करावे. समाजातील अनेक यशस्वी महिलांची उदाहरणे त्यांनी दिली. त्यामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील मुलींनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या जीवनास आकार द्यावा असे आवाहन सौ. भावनाताई नखाते यांनी केले. श्रीमती शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे दिनांक 3 जानेवारी 2022 सोमवार रोजी सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. मीराताई सरोदे, सौ. जयश्री ताई पदमवार या उपस्थित होत्या. श्रीमती कांबळे के. एच. व पूजा जाधव मॅडम यांचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले कार्य केले म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कांबळे मॅडम यांनी केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. कु. मानसी घाटूळ या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कल्याणी गवळी व कु. अंकिता सिताफळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कु. द्रोपदी सीताफळे हिने मानले. सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close