ताज्या घडामोडी

जनता विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

उपसंपादक : विशाल इन्दोरकर

दिनांक 03/01/23 रोजी दुपारी 12/00 वा. ते 01/00 वा. या कालावधीमध्ये जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नेरी ता. चिमूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन निमित्ताने महिलांवरील होणारे अत्याचार, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण, वाहतूक नियम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.
सदर कार्यक्रमास इयत्ता 5 ते 12 वी चे एकूण 500 विद्यार्थी उपस्थित होते. जनजागृती कार्यक्रम पो.नि. श्री. मनोज गभने यांचे प्रमुख मार्गदर्शनात तसेच महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. येरणे सर, सर्व शिक्षक वृंद, पोलीस स्टेशन चिमुरचे ना.पो.अं./कैलास आलाम, महिला अंमलदार महानंदा आंधळे, मयुरी कोराम, चालक पोलीस हवालदार कैलास वनकर यांचे सहकार्यातून पार पडला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close