कस्तुरी मालिकेत अभिनेत्री आशु सुरपूर यांची महत्त्वाची भूमिका
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
आज सोमवार पासून नव्याने सुरू होत असलेल्या कस्तुरी या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री आशु सुरपूर यांची एक महत्त्वाची भूमिका असून ती या मालिकेत रसिकांना बघावयास मिळणार आहे. सदरहु मालिकेत शिल्पा कुलकर्णी यांचीही एक भूमिका असून कस्तुरी मालिकेचे दिग्दर्शक दीपक नलावडे हे आहेत. आतापर्यंत20 मालिकेत आपण अभिनयाचा प्रवास पूर्ण केल्याचे आशुने सांगितले. महाभयानक कोविडच्या कालावधीत आपल्या आईचे दुःखद निधन झाल्याचे ती म्हणाली . अश्या परिस्थितीत आपण पूर्णतः खचून गेली होती. कला क्षेत्रात पुन्हा आगमन करण्यासाठी कस्तुरी मालिकेचे कार्यकारी निर्माते सुनील कुलकर्णी यांनी मला संधी दिली असल्याचे तिने सांगितले . त्यांचे आशुने आभारही मानले.
“सुरुवात छोटी असली तरी चालेल,पण मोठे होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे व महत्वाचे असते”. असे मत व्यक्त करून अभिनेत्री आशु सुरपूर हिने तिच्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्यांना कस्तुरी मालिका बघण्याचे आवाहन केले आहे. निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीस ही मालिका पडेल असा विश्वास तिने आपल्या बोलण्यातून व्यक्त केला आहे.ही मालिका कलर्स मराठी वरुन प्रसारीत होणार असल्याचे सुनिल भोसले यांनी आज या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरून बोलताना सांगितले.