निवडणुक प्रक्रीयेत सुधारणा करण्याची मागणी
जिल्हा प्रतिनिधि:अहमद अन्सारी परभणी
नुकत्याच राज्य विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुक निकालावरुन संपुर्ण राज्यात गदारोळ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर व नागरीकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढ व्हावा व निवडणूक प्रक्रिया पारदर्शि व्हावी म्हणून शेख अय्युब अमिनोद्दिन व शेख तसनिम शेख महेमुद यांनी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करणे व व्हि. व्हि. पॅट मधिल चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात यावी या बाबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यांना स्पिड पोस्टच्या माध्यमाने एक निवेदन पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उमेदवारास कंट्रोल युनिट वरील मतमोजणीवर जर आक्षेप असेल तर व्हि. व्हि. पॅट मधिल चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात यावी. या करीता मतदान संपल्यानंतर त्याच मतदान अधिकारी द्वारे व्हि. व्हि. पॅट मधिल चिठ्ठ्यांची मोजणी करुन उमेदवार निहाय सिलबंद लिफाफ्यात माॅकपोलच्या अहवाला प्रमाणे अहवाल घेऊन ठेवावा. या पध्दतीमुळे चिठ्ठ्या मोजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
या शिवाय एका मतदान केंद्रावर ७०० ते ८०० पेक्षा अधिक मतदार नसावे, जेणेकरुन चिठ्ठ्या मोजण्यास वेळ लागणार नाही व वेळेच्या आत मतदान समाप्त होईल. मतदान समाप्तीची जी वेळ असेल त्याच वेळी मतदान घेण्याची प्रक्रिया थांबविण्यात यावी. यामुळे मतदार जानून बूजून मतदानास उशिर करणार नाही. परिणामी पाच वाजेनंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढली हा प्रश्न उपस्थित होणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर सी. सी. टि. व्हि. कॅमेरे बसविण्यात यावेत आदि मागण्या करण्यात आल्या असुन या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले तर मा. उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल असे सुतोवाच करण्यात आले आहे.
याच आशयाची मागणी ईमेल द्वारे सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.