रमजानच्या पवित्र महिणा निमित्त विद्युत पुरवठा सुरळीत करणे बाबत माननीय उप अभियंता

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
म.रा.वि.वि.क.लि.पाथरी यांना बाबाजींनी मित्र मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात विनंति करण्यात आली की, प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 02/03/ 2025 ते 01/04/2025 रोजी पर्यंत पवित्र रमजान महिना असणार आहे तरी या महिन्यात मुस्लिम समाज बांधव विविध धार्मिक भक्ती व प्रार्थना करत असतात यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत असणे अत्यंत आवश्यक आहे तरी निवेदनात विनंती करण्यात आली की, पाथरी तालुक्यातील सर्व गावांमध्ये व पाथरी शहरांमध्ये ज्या ठिकाणी मेंटेनन्स ची आवश्यकता आहे ते तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे व या पवित्र महिन्यात पाथरी शहरांमध्ये व पाथरी तालुक्यातील सर्व गावांमधील विद्युत पुरवठा खंडित न करता सुरळीत ठेवण्यात यावा अशी निवेदनात मागणी करण्यात आली.
निवेदन देताना बाबाजानी मित्र मंडळाचे मुखीद जहागीरदार,बबलू कुरेशी, मोहम्मद खुर्शिद शेख, मुस्तफा अन्सारी,सरपंच राहूल ब्रह्मराक्षे,हबीब कुरेशी, मिलिंद आठवे,शफी अन्सारी,कमलाकर ढवळे, मुस्तकिम सिद्दीकी,अयाज अन्सारी,दादाराव गवारे, दिलीपराव ढवळे इत्यादींचे स्वाक्षरी आहेत.