बंडखोर आमदारांच्या वक्तवया कड़े दुर्लक्ष करुण पक्ष वाढीकड़े लक्ष्य दया-आसिफ बागवान
शिवसेना नोंदणी अभियाणाची सुरुवात
ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी
मो.7620892397
रयतेचे राजे छत्रपति शिवाजी महाराज यांचा आदर्श व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचारावर चालणाऱ्या शिवसेना पक्षाच्या विचारधारेला घेऊन चालनारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे वारसदार व शिवसैनिकाचा आदर्श आहे, एकनाथ शिंदे यानी शिवसेनेच्या 39 आमदारासह केलेल्या बंडामुळे पक्षाची निष्ठा दाखविन्याची वेळ शिवसैनिकावर आली आहे, व उधवसाहेब ठाकरे यांचे सोबत राहुन बंडखोर आमदारांच्या वक्तवयाकड़े दुर्लक्ष करीत पक्ष वाढीकड़े लक्ष्य द्यायचे आहे, असे प्रतिपादन चिमूर विधानसभा संपर्क प्रमुख आसिफ बागवान यानी शिवसैनिकाना चिमूर येथील बैटकीत केले आहे.
राज्य पातळीवरील सध्या होत असलेल्या घड़ामोड़ी मुळे व शिवसैनिकानमधे असंतोशाची लहर निर्माण झाल्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उधवसाहेब ठाकरे यानी महाराष्ट्रातील सम्पूर्ण विधानसभा क्षेत्रात आढावा घेण्याकारिता संपर्क प्रमुख याणा पाठविले आहे, त्याअनुशंगणे चिमूर येथील विश्राम गृहत आढावा बैठक सम्पन्न झाली, यावेळी विधानसभा सम्पर्क प्रमुख आसिफ बागवान, शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोड़े, उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, विधानसभा समन्वयक भाऊराव ठोमबरे, तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यानी मार्गदर्शन केले, व शिवसेना नोंदणी अभियानास सुरुवात केली,
यावेळी तालुका समन्वयक देविदास गिरड़े, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवठे, तालुका संघटक रोशन जुमड़े, उपतालुका प्रमुख विनायक मुंगले, शहर प्रमुख अन्ना गिरी, सलीम सौदागर, कवडू खेडकर, समीर बलकी, राजेंद्र जाधव, शार्दूल पचारे, सुभाष नन्नावरे रोहन नन्नावरे, विशाल शेंडे, व अन्य शिवसेना सैनिक उपस्थित होते.