ताज्या घडामोडी

सत्ताधाऱ्यांनो स्वतःहून सत्कारात घोंगडीचा स्वीकार टाळा

ना. भुजबळ यांना गंगाखेडात धनगरांचे निवेदन

जिला प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

धनगर समाजाच्या STआरक्षणाची अंमलबजावणी करेपर्यंत आपण स्वतःहून सत्कारात घोंगडीचा स्वीकार टाळावा अशी विनंती परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने मंत्री नामदार छगन भुजबळ यांना गंगाखेडात शनिवारी निवेदन देऊन केली.

मंत्री छगन भुजबळ हे बीड ला जाण्यासाठी शनिवारी सकाळी गंगाखेड येथे आले होते. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड येथे शनिवारी धनगर समाज बांधवांनी मंत्री भुजबळ यांना लेखी निवेदन दिले. आपल्या सहित सत्ताधार्‍यांनी सत्कारात घोंगडी चा स्वीकार टाळावा आशा आशयाचे लेखी निवेदन देण्यात आले. गेल्या 70 वर्षांपासून आपण सत्तेत आहात. आजपर्यंत सतराशे साठ वेळा धनगर समाजास आपणं आरक्षण अंमलबजावणीचे आश्वासन दिले. आज पर्यंत आरक्षण मिळाले नाही. आपल्याला निवेदन देऊन आम्ही कंटाळलो आहोत. आपण मंत्री असल्यामुळे येडे समाज बांधव आरक्षणाच्या शेवटी आपला घोंगडी व काठी देऊन सत्कार करतात. जो पर्यंत आपण धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करणार नाहीत. तोपर्यंत आपण मंत्री म्हणून स्वतःहून घोगडी व काठी घेऊन करण्यात येणारा सत्कार टाळावा. अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर सखाराम बोबडे, वाघालगावचे माजी सरपंच नारायण घनवटे, सतीश शिंदे, मुंजाभाऊ लांडे महेश मुंडे, नितीन वालेकर, रामेश्वर बचाटे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. धनगर समाजाने उद्विग्न होऊन दिलेल्या या निवेदनाची चर्चा सर्वत्र होताना ऐकावयास मिळाली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close