कठोर आजारपण,हरवलेला आत्मविश्वास, आलेली आर्थिक मंदी आणि अंधश्रद्धा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दवाखान्यात एकटाच बसलो होतो. नुकतंच एका रुग्णाच सलाईन संपवून खुर्चीवर येऊन बसलो. मन आनंदी होत, दुपारची वेळ होती बाजारात कुजबुज वाढत होती गर्दी च्या आवारात दवाखाना असल्याने नेहमी वर्दळ, दुपारच्या अल्प आहाराने डोक्यात आरामाची संकल्पना येतं होती.नुकतेच खुर्चीवर टेकलो तोच एक छोटा मुलगा आला आणि जखमेवर मारायचा स्प्रे आहे का? अस त्यानं विचारलं. मी मेडिकल मध्ये विचारायला सांगितलं आणि तो मेडिकल वर गेला .थोड्या वेळात तो आणि त्याची आई माझ्याकडे आले आणि त्यांनी त्यांच्या मंदिरात आनलेल्या रूग्नाबद्दल विचारणा केली. रुग्णाचा आजार संगताना त्यांनी ताप डोक्यात गेल्याने रुग्णांच्या दोन्ही पायाच्या नसा बंद पडल्याच सांगितलं.आणि मूत्र नालिकेतून रक्त येत असल्याकारणाने कॅथेटर डायरेक्ट मूत्राशयातून शस्त्रक्रिया करुन टाकले आहे असे त्यांनी सांगितले. सगळ एकूण घेतल्यानंतर मी त्यांना संगितल तूम्ही जा मी उद्या किंवा परवा माझ्या वेळेनुसार येईल आणि मलमपट्टी करील त्यावर ते दोघे निघून गेले. मी औषधोपचार दीले नाहीत कारण रुग्ण पाहिल्याशिवाय देणार तरी कस ? नंतर मी तो पेशंट पाहण्यासाठी गेलो तर कॅथेटर च्या जागेवर जखम झाली होती.त्यातून पू गळत होता मी ग्लोज घालून स्वच्छ मलमपट्टी केली आणि रुग्णाच्या तोंडून घडलेला प्रकार ऐकला. एक मध्यम परिस्थिती असणार कुटूंब, त्यात मोठा आजार फक्त ताप डोक्यात शिरल्याने नसा बंद पडल्या ,घरचा करता मानुस अंथुरणात पडून, पाहुणे नातेवाईकांनी मदत करून आजारपणात भरपूर पैसा खर्च केला, रुग्ण बरा झाला नाही, ज्याने त्याने हाथ टेकवले आणि होत नव्हतं गेलं आता हाथी आल ते वैराग्य…..! हमाली करणारा पण स्वाभिमानी ताठ मानेने जगणारा प्रानी आज कंबर साथ न दिल्याने,नसा बंद पडल्याने अंथुरणावर लोळून होता. कुणाकडून मदत मिळायचा आकार नव्हता अश्या परिस्थितीत कोणीतरी सल्ला दिला. तूम्ही सगळं केलं काही बाहेरच असेल तर बघा त्याचाही शोधाशोध झाला आतलं बाहेरल बघून झालं परिस्थिती जी आहे तीच उलट पाठीला बेड सोअर झाले. दुःख चिकदळली आणि अंथुरणात खितपत पडल्याने जीवनाच्या अनेक वाटा बंद पडल्या. कठोर आजारपण, त्यात त्यांचा पूर्णपणे आत्मविश्वास हरऊन गेला. होता-नव्हता उसना पासना करुन घेतलेल्या पैशाच डोक्यावर कर्ज झालं त्यामुळं आर्थिक मंदी आली कुटूंब हरल्यागत जीवन जगू लागलं जीवनाच्या बऱ्याच वाटा अंधकारमय झाल्या.कोणी अघोरी मार्ग सांगितले आणि ते आज एका मंदिरात उपचारावीणा देव भरवश्यावर जीवन जगू लागले.वाटेल ते आपल्या वाटेला आलेलं मंदिरातील थोड अधिक झाड-लोट स्वच्छ्ता अशी कामं करुन आज गाव सोडून ही मंडळी जिवाच्या आकांताने जिवन जगत आहेत. माणसाला परिस्थिती मार्ग दाखवत असते वेळ आणि काळ, जन्म,जिवन आणि मरण हेच जीवनाचं अंतिम सत्य असून सजीवाच्या आहार,निद्रा, मैथुन आणि भय ह्याच मुलभूत परिसीमा आहेत ह्याच्या पलीकडे समाज, कुटूंब, विद्या,व्यापार, आचार, विचार, संचार ह्या गरजेनुसार तयार झालेल्या ईतर मानवी परिसीमा आहेत. पण जन्म-मृत्यु असणाऱ्या नश्वर जगतात जिथं उगम आहे तिथं अस्त आहे, जिथं सुरुवात आहे तिथं शेवट आहे, जिथं जन्म आहे तिथं मरण अटळ आहे हे भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचा गाभा असणाऱ्या पंचशील, त्रिसरण आणि अष्टांग मार्गात हेचं सांगितलं आहे.त्यामुळे ‘अत्त दीप भव’ स्वयं प्रकाशित व्हा.जिवनात कितीही संकटं, अडीअडचणी, अडथळे आली तरी त्यांना पार करून जिवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन जगता आल पाहिजे.ज्याप्रमाणे रस्त्यात चढ उतार येतात त्याप्रमाणे आयुष्यात सुख दुःख येते त्याला पर्याय नाही.नियतीने वागल्यामुळे चांगलाच फळ मिळतं,हे कलियुग आहे यात स्वताच्या कर्माचा हिशोब इथेच याचं जन्मी द्यावा लागतो.जे कराल तेच भराल त्यामुळे कोणी कस का वागाना आपण मात्र सत्कर्माने,नियतीने, निसर्ग नियमाने वागल पाहिजे.जैसी करणी वैसी भरणी प्रमाणे माणसाला आलेला भोग भोगावाच लागतो त्यात तिळमात्र शंका नाही.स्वताच्या शरीराच्या वेदना , आलेला भोग, आलेल्या अडीअडचणी स्वतःलाच भोगाव्या सोडवावा लागतात,त्यामुळे कुणाच्या मायाजाळात अडकून न राहता आपली मुक्ती आणि मोक्ष प्राप्तीसाठी जगलं पाहिजे भगवत गितेत कृष्णाने अर्जुनाला स्वताच्या कर्माचीच ओळख दिली आहे स्वतःच कर्म पार पाडणे हाच सगळ्यात मोठा धर्म आहे.
असो, एका कुटुंबावर जेंव्हा आरोग्य विषयक संकट येतं किँवा कुणाचा एखादया आजारपणात आकस्मित मृत्यू होतो तेंव्हा शरीराची काळजी वाटते मित्रांनो येत्या काळात शरीर संपत्ती हिच जगातील सर्वोत्तम संपत्ती असणार आहे त्यामुळे व्यायाम, योगा, प्राणायाम,सकस संतुलित आहार घेऊन जसं गाडीला सतत सर्व्हिसिंग ची गरज असते अगदी तसच माणसाला आजारापासून दूर राहण्यासाठी व्यायाम, योगा, प्राणायाम सकस संतुलित आहार महत्त्वाचा आहे. सध्याच्या काळात मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, हार्ट अटॅक आदी रोगांनी नवतरुण जिवन गमावत आहेत.त्यामुळे आरोग्य,खानपान,आहार, विहार याकडे आपलं लक्ष असल पाहिजे. आरोग्य विषयक समस्यासाठी नक्की सम्पर्क करा.आणि हेल्दी रहा. आनंदी रहा.
लेखन आणि शब्दांकन – लेखक तथा आरोग्य सल्लागार डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर