ताज्या घडामोडी

परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे श्रीरामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

कार्यक्रमाच्या मुख्य दिवशी रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 सकाळी नऊ वाजता धूनी पूजा, सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत सौ अनुराधा रवींद्र पिंगळीकर औरंगाबाद यांची श्रीराम जन्म विशेष कीर्तन सेवा संपन्न झाली, दुपारी सव्वा बारा वाजता अॅड.श्री.मुकुंदराव चौधरी यांचे शुभहस्ते गव्हाच्या पोत्याचे पूजन व त्यानंतर श्री सूर्यभान तुळशीराम सांगडे यांचे शुभहस्ते त्यांचे निशाणाचे पूजन व निशाण मंदिराचे शिखरावर उभारण्यात आले, सायंकाळी पाच वाजता श्रींच्या रथाची भव्य मिरवणूक निघाली. तसेच सांगता दिवशी सोमवार दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत सौ अनुराधा रवींद्र पिंपळीकर औरंगाबाद यांची गोपाळकाल्याच्या कीर्तनाची सेवा होईल व त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल. अशी माहिती श्रीसाई स्मारक समितीचे प्रताप आम्ले चौधरी यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close