ताज्या घडामोडी

आ.गुट्टे यांनी घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट

नॅशनल हेल्थ मिशन मधून उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड होणार शंभर खाटांचे

पालम व पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयातील भौतिक सुविधेत वाढ करण्यासंदर्भात आरोग्य मंत्र्यांनी दिली ग्वाही

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

गंगाखेड मतदार संघातील आरोग्यसेवा बळकट करण्याकरिता शहरासह ग्रामीण व अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ प्राधान्याने मिळावा याकरिता नागरिकांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा.ना.भारतीताई पवार व महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा.ना. राजेश टोपे यांना गंगाखेड मतदार संघातील आरोग्यसेवा भौतिक सुविधा वाढ करणे विषयी दिलेल्या निवेदनास राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ मंजुरी देण्यासंदर्भात ग्वाही दिली आहे.
आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनामध्ये उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड ५० खाटावरून १०० घाटामध्ये श्रेणीवर्धन करण्यात यावे यासाठी अंदाजे वार्षिक खर्च ६ कोटी ७१ लाख १९ हजार ६०० रुपयांचा तर ग्रामीण रुग्णालय पूर्णा ३० खाटावरून ५० घाटामध्ये श्रीवर्धन करण्यासाठी अंदाजे वार्षिक खर्च ७७ लक्ष ५० हजार ६६७ रुपये एवढा येणार आहे. ग्रामीण रुग्णालय पालम व ग्रामीण रुग्णालय पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात आज रोजी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधेत वाढ करून रुग्णांना अद्यावत आरोग्य विषयक सेवा देण्यासंदर्भात मागणी केली. आरोग्यमंत्र्यांनी या सर्व बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार गुट्टे यांच्या मागणीस विशेष प्राधान्य देत लवकरच या सर्व कामांना नॅशनल हेल्थ मिशन मधून मंजुरी देण्याची ग्वाही दिली.
गंगाखेड मतदारसंघातील नागरिकांना सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवा देणे हे जनसेवक या नात्याने माझे कर्तव्य समजून यास मी सदैव प्राथमिकता देत आलो आहे. शहरी भागासह ग्रामीण व अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा देणे सोयीचे व्हावे व त्याचबरोबर मतदार संघातील आरोग्यसेवा बळकट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे आमदार गुट्टे यांनी निवेदनात म्हटले आहे.
आमदार गुट्टे यांच्या प्रयत्नाने उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड ५० खाटावरून १०० खाटामध्ये श्रेणीवर्धन करण्यासह ग्रामीण रुग्णालय पालम व ग्रामीण रुग्णालय पूर्णा येथील आरोग्य विषयी भौतिक सुविधेत वाढ करण्याच्या कामाला विशेष प्राधान्य देऊन मंजुरी देण्याची राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी ग्वाही दिली असल्याने भविष्यात मतदार संघातील नागरिकांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा मिळणे सोयीचे होईल हे मात्र निश्चित.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close