कोरोनामुळे व्यवसायिकांना फटका
ग्रामीण प्रतिनिधी : जयश्री खोब्रागडे जुनासुर्ला
जिल्ह्यात सध्या लग्न समारंभाची धामधूम सुरू झाली असून कोरोनामुळे प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमवालीनुसार मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पडत आहेत. त्यामुळे मंडप, डेकोरेशन, बँड पार्टी आदी व्यवसायिकांना गतवर्षी सारखे यावर्षी सुद्धा फटका बसला आहे. लग्नसोहळ्याची संबंधित व्यवसायावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या वर्षी व्यवसाय थोडाफार होईल या आशेने व्यावसायिक होते मात्र कोरूना जिल्ह्यात हळूहळू पाय पसरू लागल्याने लग्न सोहळा मधील उपस्थितीवर नियम लावून दिले आहे. त्यामुळे पूर्वीसारखे लग्न सोहळ्यात बँड, मंडप, डेकोरेशन लावताना दिसत नाही. त्यामुळे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला असून त्यांचे साहित्य धूळखात पडलेले दिसून येत आहे. मागील दोन वर्षापासून या व्यावसायिकावर परिणाम पडला असल्याने या व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे हजारो हजारो कुटुंब यांना व्यवसाया अभावी हालाखीचे जीवन जगावे लागत आहे.