ताज्या घडामोडी

चिमूर वाकर्ला ही बस विद्यार्थ्यांसाठी नियीमत वेळेवर सुरू करा

शिवसेनाच्या वतीने चिमूर आगर व्यवस्थापकांना दिली निवेदन.

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

चिमूर आगारातून वाकर्ला बस विद्यार्थ्यांसाठी नियमित वेळेवर सुरू करा या मागणसाठी चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने आज दिनांक १ सप्टेंबर रोजी आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले.
चिमूर वाकर्ला ही बस मागील १० वर्षापासून नियमीत चालू आहे. मौजा भिसी वाकर्ला आंबोली गडपिपरी पुयारदंड येथिल सर्व विद्यार्थी हायस्कुल ते जुनियर कॉलेज यामधील असून भिसी येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे चिमूर वाकर्ला या बसवर संपूर्ण निर्धारित आहेत. चिमूर वाकर्ला या बसच्या व्यतिरीक्त दुसरा कोणताही जाण्या-येण्याचा पर्याय विद्यार्थ्याकडे नसुन ही बस अलीकडे अनियमीत आणि विद्यार्थ्यांच्या शालेय वेळेवर न येता उशीरा येत असते, कधीकधी सदर बस ही येत सुद्धा नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होत आहे. या करीता चिमूर आगार व्यवस्थापकांना विद्यार्थ्यांची ही गंभीर समस्या घेऊन शिवसेनेच्या वतीने श्रीहरी सातपुते यांचे नेतृत्वात शिक्षण सुरळीत ठेवण्याकरीता ही बस नियमीत आणि वेळेवर सुरू रहावी या करीता आगार प्रमुख इंम्रान शेख यांना निवेदन देण्यात आले,
यावेळी शिवसनेचे माजी तालुकाप्रमुख श्रीहरी सातपुते,
तालुका संघटक रोशन जुमडे,
प्रसिद्धी प्रमुख सुनील हिंगणकर, शहरप्रमुख सचिन खाडे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख राज बुचे,
युवा सेना तालुकाप्रमुख शार्दुल पचारे, कमलाकर बोरकर, सत्यम नामे, विद्यार्थिनी सेजल गुंडेवार ऐकोंकर,सुहानी अंकुश सूर्यवंशी, अनुष्का उद्धव मोहोळ, तृप्ती शैलेश बनसोड, सानिया मनोज सरदार , मुस्कान सुधाकर गोगले, पूजा रमेश ठाकरे, प्रतीक गारघाटे व अन्य विद्यार्थी उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close