कोरोना सदृश्य काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य केंद्रात जावून तपासणी करुन घ्यावी – जिल्हाधिकारी आचल गोयल
प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
(जिमाका) :- जगातील काही देशात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार B.1.1529 या विषाणूचे बोटस्वानामध्ये 3 दक्षिण आफ्रिकेत 6 तर हाँगकाँगमध्ये 1 रुग्ण आढळून आले आहेत. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने National Centre for Disease Control (NCDC) सरकारला या विषाणूबद्दलची माहिती दिली आहे. हा विषाणू वेगाने प्रसार होणार असल्यामूळे याचा सार्वजनिक आरोग्यावर गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामूळे बाहेर देशातून आलेल्या प्रवाशामूळे सदर विषाणूचा संसर्ग होवू नये या करीता बाहेरुन आलेल्या प्रवाशांनी जिल्हा शल्य चिकीत्सक व महानगरपालीका आरोग्य विभागाकडे स्वतःची सर्व माहिती नोंदवावी व RTPCR चाचणी करुन घ्यावी. जिल्हयातील नागरिकांनी आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, कोरोना सदृश्य काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य केंद्रात जावून तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.
जिल्हयात कोरोना रुग्णसंख्या प्रमाणात असल्याने जिल्हावासियांना कोरोना निर्बंधातून सूट देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने जगातील काही देशात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार B.1.1529 या विषाणूचे बोटस्वानामध्ये 3 दक्षिण आफ्रिकेत 6 तर हाँगकाँगमध्ये 1 रुग्ण आढळून आले आहेत. सदर विषाणू वेगाणे वाढणार असल्याने देशातील सार्वजनिक आरोग्यावर गंभिर परिणाम होऊ शकतो. त्यामूळे केंद्र शासन, आरोग्य मंत्रालयाने बोटस्वाना, दक्षिण आफ्रिका आणि हॉगकॉगमधून येणाऱ्या प्रवाशांच्या किंवा त्यामार्गे इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. विषाणूचा हा व्हेरिएंट, डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही वेगाने पसरणारा असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने कळविले आहे. सद्यस्थितीत भारतात हा विषाणू आढळून आला नसला तरी कोरोना संसर्गात वाढ होवू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामूळे नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे व संसर्ग वाढणार नाही यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. असेही कळविले आहे.