ताज्या घडामोडी

श्रीसाईबाबा जन्मस्थान पाथरीजिल्हा परभणी मंदिरात विजयादशमी 2024 उत्सवाची उत्साहात सुरुवात

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी


दिनांक 11.12024 शुक्रवार रोजी उत्सवाचा प्रथम दिवस.
मंदिरातून द्वारकामाईकडे पारायण मिरवणूक निघाली. श्रींची प्रतिमा आदरणीय एडवोकेट श्री अतुल दिनकरराव चौधरी, व्यवस्थापकीय विश्वस्त महोदय अजय पाथरीकर गुरुजी यांनी घेतली. आदरणीय श्री संजय प्रभाकर भुसारी विश्वस्त महोदय यांनी बाबांच्या पादुका घेतल्या. आदरणीय श्री सूर्यभान सांगडे कोषाध्यक्ष विश्वस्त महोदय यांनी विना घेतला. पारायण मिरवणूक द्वारकामाईत गेल्यावर आदरणीय संजय भुसारी विश्वस्त महोदय यांचे हस्ते साई चरित्र ग्रंथाचे पूजन करून अध्याय क्रमांक एकचे पठनास सुरुवात करण्यात आली. अध्याय क्रमांक दोनचे पठण व्यवस्थापकीय विश्वस्त महोदय अध्याय क्रमांक 3 चे पठण कोषाध्यक्ष विश्वस्त महोदय अध्याय क्रमांक 4 चे पठण सौ जयश्री बाळासाहेब तळेकर अध्याय क्रमांक पाचचे पठण मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. कोषाध्यक्षक विश्वस्त महोदय सूर्यभान तुळशीराम सांगडे यांचे शुभ हस्ते परमपूज्य साईबाबांना महाअभिषेक करण्यात आला.
पूजेचे पौरोहित्य अतुल शास्त्री दडके यांनी केले. दुपारी 10 ते 11 श्री ह भ प अंगद गुरुजी डाके महाराज माजलगावकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. त्यानंतर परमपूज्य श्रीसाईबाबांची महाआरती व नंतर महाप्रसाद झाला. सायंकाळी धुपारती नंतर परम पूज्य श्री साईबाबांची पालखी मिरवणूक निघेल. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एन के कुलकर्णी यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close