ताज्या घडामोडी

पाथरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

अहिल्या नगर पाथरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.या ठिकाणी आजच्या आरतीचे यजमानपद मा.दादासाहेब टेंगसे माजी शिक्षण व आरोग्य सभापती जि.प.परभणी व सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती जि.प.परभणी यांनी भूषविले व भाविकांशी सवांद साधला.
परिसरात स्वच्छता पाळणे हे आपले कर्तव्य आहे तसेच युवकांनी व्यसनापासून दूर राहावे.आजचा युवक खूप व्यसनाधीन झाला आहे अनेक आजार त्यांना होतात आज संकल्प करा की व्यसन करणार नाही असे प्रतिपादन युवा नेते स्वच्छता ब्रॅण्ड अँबिसेटर जुनेद भैया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले मा.आमदार बाबाजानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते जुनेद भैया साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाथरी शहर प्रगती करत आहे.शहरातील स्वच्छतेसाठी जुनेद भैया यांनी खूप मेहनत घेऊन शहराला राज्य शासनाचा स्वच्छ व सुंदर शहर प्रथम क्रमांक पटकावला आहे

  • दादासाहेब टेंगसे
    यावेळी माजी नगरसेवक अलोक मालक चौधरी,माजी प.स.सभापती सदाशिव थोरात,सुनील पितळे,बंडू सातपुते व परिसरातील युवक भाविक भक्त उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close