आनंद निकेतन महाविद्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम
वरोरा आनंद निकेतन महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा च्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग घेतले जातात यासाठी महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. हे वर्ग प्रत्येक रविवारला घेतले जातात, तर मार्गदर्शन केंद्राच्या या वर्षीच्या उद्घाटन सोहळ्याचे औचीत्त्य साधून वरोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांना उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमात आमंत्रित आयुष नोपानी IPS यांनी विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर मार्गदर्शन केले, यात स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी महत्वाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली . विदयार्थ्यांच्या विविध प्रश्नांना नोपानी यांनी अतिशय समर्पक उत्तरे देत परीक्षेविषयीचे समज गैरसमज दूर केले . प्रश्न उत्तराच्या माध्यमातून विद्यार्थी आणि मार्गदर्शक असा संवाद साधला गेला. इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अरविंद ढोके यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला . कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. पल्लवी गहुकर तसेच कार्यक्रमाचे आभार टिंकल अंद्रस्कर हिने व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे ,इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अरविंद ढोके, डॉ. चंद्रभान जीवने, डॉ. निलेश उगेमुगे , प्रा. तिलक ढोबळे तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. हेमंत परचाके उपस्थित होते.