ताज्या घडामोडी

विजयादशमी उत्सवाचे औचित्य साधून वि.बा. खेर सभागृहाचे उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

साई भक्तांची वाढती गर्दी विचारात घेता साई भक्तांच्या सोयीकरिता श्रीसाई स्मारक समितीच्या व्यवस्थापन मंडळाने सभागृहाची उभारणी केली आली आहे.
परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थानचे संशोधक वि बा खेर यांचे मोलाचे योगदान विचारात घेता या सभागृहास वि बा खेर सभागृह असे नाव देण्यात आले आहे. पुण्यतिथी उत्सव 2022 मध्ये दुग्ध शर्करा योग आल्याने या सभागृहाचे उद्घाटन कै.वि.बा. खेर यांच्या कन्या सौ सोनवी देसाई, अंतरा देसाई नात, तसेच श्री हर्षद हिदायततुल्लाह कै. खेर यांचे पुतन जावई, शैलजा श्रीकृष्ण खेर पुतणी, प्रथम मॅनेजींग ट्रस्टी कै. दिनकरराव वासुदेवराव चौधरी यांच्या सविद्य स्नुषा सौ प्रज्ञा अतुल चौधरी, व्ही के सावंत अहमदनगर साई भक्त सेवा मंडळचे अध्यक्ष व थोर समाजसेवक, कोषाध्यक्ष विश्वस्त श्री सूर्यभान सांगडे, विश्वस्त संजय भुसारी यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून वि. बा. खेर सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
किर्तन, भजन, वगैरे धार्मिक कार्यक्रम तसेच वाढदिवस, कुंकू टिळा, लग्नकार्य वगैरे साठी वि. बा. खेर सभागृहाचा उपयोग होईल.
या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे विश्वस्त वास्तु विशारद श्री सुभाष दळी, युवराज पातुरकर, सौ नीलिमा भुसारी, सौ शुभांगी पातुरकर, सौ छाया कुलकर्णी मंदिर प्रमुख, एन के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रभाकर पाटील, मोहन महाराज पोपळघट वगैरे उपस्थित होते.
या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजयजी भुसारी विश्वस्त यांनी केले. सूत्रसंचालन करताना त्यांनी वरील प्रमाणे माहिती दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close