चारगांव (बु) ग्रामपंचायत मध्ये विधवा प्रथा निर्मुलनाचा ठराव मंजूर
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा तालुक्यातील मौजा चारगांव बु. ग्रामपंचायत येथे सरपंच योगीराज वायदुळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेचे संचालन ग्रामविकास अधिकारी अजय कटाईत यानी केले.या सभेत विविध विषय चर्चेला घेण्यात आले. या विषया पैकी”विधवा प्रथा निर्मुलन बाबत ठराव करणे”असा एक सामाजिक विषय सुद्धा चर्चिला गेला. याच विषयाच्या अनुशंगाने प्रा.विजय गाठले यांनी ग्रामसभेला संबोधित केले.या विषयावर मार्गदर्शन करताना प्रत्येक विधवा महिलांना समाजामध्ये संन्मान देऊन विधवांच्या बाबतीत ज्या धार्मिक कुप्रथांचा आहे. त्यांचा त्याग करणे सामाजिक दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे,तेव्हाच सामाजिक समता, स्त्री समानता प्रस्थापित होईल असे प्रा.विजय गाठले यांनी प्रतिपादन केले. परिणामतः ग्रामसभेच्या सदस्यांनी सहमती दर्शवून बहुमताने विधवा प्रथा निर्मुलना बाबतचा ठराव संमत करण्यात आला. विशेषकरून या ग्रामसभेला बहुसंख्य सभासद उपस्थित असुन महिलांची उपस्थिती लक्षणीय होती हे विशेष.