केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी: अहमद अन्सारी परभणी
पूर्णा तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळा फुळकळस येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ माननीय शिवानंद टाकसाळे यांच्या प्रेरणेने शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख सिद्धार्थ मस्के यांनी सदरील केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सिद्धार्थ मस्के तर प्रमुख अतिथी म्हणून माखणी शाळेचे मुख्याध्यापक संजय जोशी. कमलापूर शाळेचे मुख्याध्यापक बापूराव पलये, लिमला शाळेचे मुख्याध्यापक स्मिता डिग्रस्कर आदींची उपस्थिती होती.
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद अनेक विषयांवर सुलभकांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना सिद्धार्थ मस्के म्हणाले की,” शिक्षण परिषदांचे आयोजन शिक्षकांच्या ज्ञानात भर पडणे आणि चिकित्सक विचारांना चालना देण्यासाठी असते”. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खडाळा येथील पदवीधर शिक्षक कैलास सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन तानाजी कळसकर यांनी केले.
सुलभक म्हणून बी.आर.जी.सदस्य कैलास सुरवसे, कमलापूर शाळेचे महेश जाधव, संतोष रत्नपारखे,नितीन चौकेवार, माखणी येथील सुनील शेळके फुलकळसचे प्रशांत टाक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय प्राथमिक शाळा फुलकळस येथील महेश लोहकरे रुकमाकांत लेंडाळे सुरेश कापसे विद्या सोळुंके अनिता सावळे अंजली रिंगणे यांनी अथक परिश्रम घेतले.