ताज्या घडामोडी

काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून आशांनी केला जीआर न काढणाऱ्या राज्य शासनाचा चंद्रपूरात निषेध

काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून आशांनी केला जीआर न काढणाऱ्या राज्य शासनाचा चंद्रपूरात निषेध

शेकडों आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

अनेक कामगार संघटनांच्या आघाडीने बनविलेल्या महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने राज्यभर ठिय्या आंदोलन सुरू आहे.
राज्यव्यापी संपाच्या 19 व्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील आयटक व सिआयटीयू संघटनेच्या नेतृत्वात आशा व गटप्रवर्तकांचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू असल्याचे दिसून आले.शासनाने आश्वासन देऊनही अद्याप जीआर काढला नाही.त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांत संताप व्यक्त केल्या जात आहे.जीआर न काढणाऱ्या राज्य सरकारचा आशांनी आज काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून निषेध नोंदविला .
या वेळी सिआयटीयूचे अध्यक्ष कॉ. रमेशचंद्र दहिवडे, आयटकचे कॉ. रवींद्र उमाटे, महिला कार्यकर्त्या प्रीतीशा साधना, कॉ. किशोर जामदार, कॉ. अरुण भेलके, कॉ. प्रमोद गोडघाटे, सहसचिव सायली बावणे, उषा येनूरकर आदिंनी मार्गदर्शन केले.
आश्वासनाची पूर्ती करा, नाहीतर खुर्ची खाली करा!
आशांना दुस-यांदा संपावर लोटणाऱ्या सरकारचा निषेध असो! अश्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वातावरण दुमदुमून गेले होते.आजच्या आंदोलनात
सुलभा पाटील, नंदा मडावी, संगीता डोरलीकर, विजया राऊत, चंद्रकला चांभारे यांचेसह शेकडों आशा वर्कर व गटप्रवर्तक (कर्मचारी )सहभागी झाले होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close