ताज्या घडामोडी
तब्बल १२ तास ब्रम्हपुरी नगर परिषद विजेविना
तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे
ब्रम्हपुरी येथील स्वयत संस्था असलेल्या नगर परिषद इमारतीचा विद्युत पुरवठा विज बिल नं भरल्यामुळे विद्युत विभागाकडून डी. पी. वरून खंडित करण्यात आले. त्यामुळे सुमारे १२ तास नगर परिषद इमारतीतील कर्मचारी बिना विजवीना काम करत होते. ५० लक्षाहून अधिक विज बिल नगरपरिषदेचे थकीत असल्यामुळे विद्युत विभागाने डी. पी. वरून विद्युत खंडित केले त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नगर परिषदेकडून धनादेश बँकेत जमा करण्यात येईल असा आदेश मुख्याधिकारी आशिया जुही यांनी आश्वासन दिले. त्यानंतर विद्युत विभागाने विद्युत पुरवठा पूर्वरत केला. त्यामुळे तब्बल १२ तास बिनवीजेवीना कर्मचारी काम करत होते. हा सगळा प्रकार २९ नोव्हेंबर २०२४ ला घडला आहे.