ताज्या घडामोडी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी आणि जयंती निमित्त विधवा मातांचा देखील सत्कार करण्यात आला

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.03/ 01/2022 रोजी पाथरी येथे रात्री ठिक सात वाजता सौ.मंगल सुरवसे यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून छोट्या बालिका कु.श्रद्धा राहुल मनेरे व कु.रूपाली राहुल कांबळे या दोन्ही बालिकांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भुमिकेत सर्व सावित्रीबाई फुले यांचा साज घालून सहभाग घेतल्या बद्यल दोन्ही चिमुकल्याचे समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला व महिला पदधिकारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर आधारित गीत गायन करून कार्यक्रमाची सुरूवात केली आणि जयंतीचे औचित्य साधून आमची प्रिय मैत्रीण सौ.मंगल सुरवसे पोलीस महिला ग्रामीण तालुका अध्यक्ष यांचा वाढदिवस समितीच्या वतीने करण्यात आला सर्व महिला पदधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती

आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.सुमन साळवे यांची प्रमुख उपस्थिती होतीआणि प्रमुख पाहुणे म्हणून सौ.भाग्यश्री व सौ.मंदा अशोक साळवे उदघाटकः महणुन श्रीमती इंदुमती वाकडे यांची प्रमुख उपस्थित होत्या मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा. सौ.रेखाताई मनेरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः केले आणि आभार सौ.मुक्ताबाई डोगंरे यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रमसौ.मंदा साळवे सौ.मुक्ताबाई डोगंरे सौ. सौ.मंगल सुरवसे सौ.रेखा मनेरे सौ.शिला गायकवाड सौ.लताबाई रतन साळवे सौ.सुशिला मनेरे श्रीमती इंदुमती वाकडे व इतर सर्व महिला पदधिकारी उपस्थित होत्या विधवा मातांचा देखील येथे सत्कार करण्यात आला सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close