ताज्या घडामोडी

संभाजी ब्रिगेड चे रौप्य महोत्सव अधिवेशन पुणे येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे:- नितीन देशमुख

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

संभाजी ब्रिगेडच्या पुणे येथे होणाऱ्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाला परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी , कार्यकर्ते , सुशिक्षित बेरोजगारासह ,जेष्ठ नागरिक , शेतकरी सर्व क्षेञांतील मान्यवरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन भैया देशमुख यांनी केले आहे

संभाजी ब्रिगेडची २५ वर्षे परीवर्तनाची पुर्ण होत असुन संभाजी ब्रिगेड नेमकं करते तरी काय ध्येय धोरणे उदिष्ट यांचा संपूर्ण आढावा या रौप्यमहोत्सवी अधिवेशनात घेतला जाणार असुन आतापर्यंत संभाजी ब्रिगेडने सामाजिक , शैक्षणिक, राजकीय, आर्थिक , आरक्षण , रोजगार ,नोकरदार , विद्यार्थी, आरोग्य क्रीडा , आपत्ती व्यवस्थापन , गडकिल्ले , संस्कृती , इतिहास , आशा‌ अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले ,संभाजी ब्रिगेड नेमकं करते काय व संभाजी ब्रिगेडमध्ये सामील का व्हायचं या सर्व गोष्टींचे सविस्तर मार्गदर्शन संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनात केले जाणार आहे.

संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनासाठी एक दिवस समाजासाठी, एक दिवस आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी , पैसा , आकांक्षा , ज्ञान , शिक्षण अनुभव कौशल्य , प्रेरणा , इच्छाशक्ती , व यशस्वी होण्यासाठी नेमकं काय लागतं यावर अतिशय सुंदर मार्गदर्शन लाभणार असुन या कार्यक्रमाला उद्घाटक व प्रमुख उपस्थिती पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार ( मा केंद्रीय मंत्री ) पृथ्वीराज चव्हाण ( मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) श्रीनिवास पाटील लोकसभा खासदार , श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांची प्रमुख उपस्थिती तर प्रविण दादा गायकवाड ( प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड ) यांचे प्रमुख मार्गदर्शक लाभणार असुन हा कार्यक्रम बुधवार दिनांक २८ डिसेंबर सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे या ठिकाणी होणार असुन संभाजी ब्रिगेडच्या या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाला‌ हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन भैया देशमुख, गोविंद इक्कर, माउली हिंगे,मंगेश भरकड यांनी केले आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close