ताज्या घडामोडी

विकासाचा प्रवास रस्त्यावर होतो- आ. गुट्टे

आमदार गुट्टे यांच्या हस्ते कोद्री,आंतरवेली ते बीड जिल्हा हद्द या ६ कि.मी. रस्त्याच्या २ कोटी ४९ लक्ष रुपयांच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

एखाद्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्या भागातील रस्त्यांची विकास कामे होणे अत्यंत गरजेचे असून आधुनिक विकासाचा प्रवास रस्त्यावरून होतो असे आ.गुट्टे यांनी म्हटले आहे. गंगाखेड तालुक्यातील कोद्री,अंतरवेली ते बीड जिल्हा हद्द या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.


गंगाखेड तालुक्यातील कोद्री,अंतरवेली ते बीड जिल्हा हद्द हा ६ कि.मी. पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने दळणवळणाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेपर्यंत आणि ऊस कारखान्यापर्यंत आणताना अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असे. आमदार गुट्टे यांनी याबाबतचे गांभीर्य ओळखून सतत पाठपुरावा ठेवल्याने या ६ कि.मी. रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाकरिता २ कोटी ४९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून आज त्या कामाचे भूमिपूजन आमदार गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री वसंतराव सानप (ज्येष्ठ अधिकारी) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य राजेश फड, पंचायत समिती सभापती मुंजाराम मुंडे, गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, गंगाखेड तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मुंडे हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजीराव चाटे सरपंच अंतरवेली, रावसाहेब सानप सरपंच वाघदरी, शंभूदेव मुंडे सरपंच बडवणी, बाळू मुंडे उपसरपंच सेलमोहा, सुशील केंद्रे सरपंच उंडेगाव, नितीन खोडवे सरपंच डोंगरजवळा, वैजनाथ तिडके सरपंच डोंगरपिंपळा, महावीर गाडे सरपंच डोंगरगाव, भाऊराव मुंडे सरपंच ढेबेवाडी, तुकाराम चाटे सरपंच आनंदवाडी, शिवाजीराव कातकडे सरपंच कातकरवाडी, विष्णू अण्णा मुंडे मा. सरपंच अंतरवेली, विश्वनाथ बिडगर, पत्रकार रमेश कातकडे, लिंबाजी चाटे, व्‍यंकटी जायभाय, माधवराव तांदळे, श्री राठोड कनिष्ठ अभियंता सा.बा. विभाग गंगाखेड यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमंत रंगनाथराव नागरगोजे सरपंच तांदळवाडी यांनी केले.
कोद्री,अंतरवेली ते बीड जिल्हा हद्द या रस्त्याचे डांबरीकरण झाल्यावर परिसरातील नागरिकांचा दळणवळणाच्या प्रश्न कायमचा सुटणार असून आमदार गुट्टे यांच्या कार्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close