यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार
नाथ शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणा सोबतच क्रीडा व कलेला प्राधान्य देते – प्रदीप खाडे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाथ शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोबतच विद्यार्थ्यांमध्ये असलेला क्रीडा आणि कलागुणांना प्राधान्य देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने कार्य करत आहे असे मनोगत यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथील क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारा प्रसंगी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांनी व्यक्त केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड व गटशिक्षणाधिकारी कार्यालय परळी वैजनाथ त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा मल्लखांब स्पर्धेत व तालुका क्रिकेट स्पर्धेत विजय संपादन केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात नाथ शिक्षा संस्थेच्या सहसचिव प्रदीप खाडे, उद्योजक सुरेश नाना फड, प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते या विजयी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा मल्लखांब स्पर्धेत यश मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले चि.आर्यन फड, चि. प्रथमेश दुबे यांचा तर तालुका क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वप्रथम येऊन जिल्ह्यासाठी निवड झालेल्या संघातील विद्यार्थी शेख रेहान,ओमकार चाटे,शेख आयान,मनोज फड,हनुमंत मुंडे,सोमनाथ मुंडे,महादेव भाकरे,शेख समीर,अर्शद पठाण,यश हंगे,किरण मुंडे,शिवाजी गीत्ते,सोमनाथ रेवले या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.यु.एन.फड, प्रास्ताविक प्रा.एस.आर. कापसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.किरण शिंदे यांनी केले या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.