गंगाखेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ एफ. वरील खड्डे बुजवायच्या कामाला सुरुवात
आ.गुट्टे यांनी कानउघाडणी केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी लागले कामाला.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.२६ सप्टेंबर वार रविवार रोजी आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ एफ. परळी रोडवरील नवीन मार्केट यार्ड ते बसस्थानका पर्यंतचे शहरातील सर्व खड्डे बुजवण्या बाबतीत राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ एफ चे कार्यकारी अभियंता श्री स्वामी व उपअभियंता श्री भोपळे यांना चांगलेच धारेवर धरून शहरातील सदरील रस्ते आजच्या आज बुजवण्याचे निर्देश दिल्याने खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात झाली.
गंगाखेड शहरातून परळीहून गंगाखेड मार्गे पालम कडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१एफ वर गंगाखेड शहरात रस्त्यात जागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अनेक अडथळे निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. या बाबतीत अनेकांनी संबंधित विभागाकडे लेखी निवेदने देऊनही खड्डे बुजवण्याचे काम केले जात नव्हते.याबाबतीत आ. गुट्टे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांना आमदार गुट्टे यांनी चांगलेच धारेवर धरले. वाहतुकीस मोठा अडथळा ठरलेले राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आजच्या आज भूजवण्याचे निर्देश दिल्याने राष्ट्रीय महामार्गचे उप अभियंता श्री भोपळे यांनी स्वतः खड्ड्यांची पाहणी करून उपलब्ध सर्व यंत्रणा कामास लावून खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात केली आहे. आ.गुट्टे यांच्या प्रयत्नाने शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली असून आनंद इंडियन ऑइल (जंगले पेट्रोल पंप) येथील महामार्ग वरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात खडी टाकून व सरकारी दवाखान्या जवळ पडलेल्या खड्ड्यात सुद्धा खडी टाकून खड्डे बुजवण्यात सुरुवात झाली आहे. महामार्गावरील व शहरातील खड्डे बुजवल्याने वाहतूकदारांनासह सर्वसामान्य नागरिकांना काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे.