2016 पासून पीडित शेतकऱ्यांचे न्यायासाठी संघर्ष सुरू

अखेर न्याय न मिळाल्यामुळे शेतातील पांदन रस्त्या समोर आमरण उपोषणाला सुरुवात
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी येतील शेतकरी पुरणलाल आसाराम पारधी या शेतकऱ्यांच्या पांधन रस्त्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी 0.22 आर सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांच्या येण्याजाण्याचा रस्ता बंद पडल्यामुळे त्यांच्या शेतातून निघणारा उत्पादन आहे त्यांनी घरी कसा आणावा प्रश्न निर्माण झालेला आहे.

त्यांचे शेतीकडे जाणारा रस्ता खुला करुन देण्यात यावा याकरिता पीडित शेतकरी हे शेतातील पांदन रस्त्याचे समोर 11 जानेवारी 2022 पासून आमरण उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत रस्ता खुला करून देणार नाही तोपर्यंत आपण आमरण उपोषणाला बसणार असे त्यांनी असल्याचे .याबाबत सविस्तर वृत्त असे की भूमापन क्रमांक 17 या रस्त्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे शेतकऱ्याला शेताकडे जाण्याचा रस्ता नाही .त्यामुळे त्यांनी शेती कशी करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे? शेतातील धान्य घरी कसा आणावे हा सुद्धा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण केलेला आहे? त्यांनी आपली उदरनिर्वाह कशी करावी हा प्रश्न सुद्धा त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे ?याकरिता त्यांनी तहसीलदार गोरेगाव यांना अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला परंतु त्या रस्त्याकडे अजून दुर्लक्ष करण्यात आले .त्यामुळे त्यांनी बेमुद्दत उपोषण कलपाथरी येथे आपल्या शेती मध्ये बमुद्दत उपोषण सुरू केले आहे.