श्रीमती मसरत फातेमा खान यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद येथे मराठवाडा विभागीय स्तरीय चर्चासत्र व सर्व विषयांच्या संबोधावर आधारित शैक्षणिक साहित्याचे वापर करून कृतीयुक्त अध्यापन करणे या विषयावर विभागीय स्तरावरील कार्यशाळेत सादरीकरण व शिक्षकांना मार्गदर्शन या स्पर्धेत श्रीमती मसरत फातेमा इलियास अली खान प्राथमिक पदवीधर जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा शाखा क्रमांक १ मानवत यांनी सहभाग नोंदवून विभागीय स्तरावर तिसरे स्थान प्राप्त केले त्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले.
यानिमित्त त्यांच्या मानवत येथील उर्दू शाळा १ मध्ये सत्कार व गुण गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. पत्रकार संरक्षण समितीचे मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी यांच्या प्रेरणेतून व पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मानवत गट शिक्षणाधिकारी श्री रणमाळे सर केंद्रप्रमुख लोहट सर आदींनी आपल्या भाषणात श्रीमती मसरत मॅडम यांचा गुण गौरव करून सत्कार सुद्धा केला. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक अकबर अन्सारी, नियामत खान ,जमील भैया अफसर अंसारी , हाफेज असलम खान, खाजाभाई कुरेशी, हेडमास्टर अजिज अन्सारी जावेद अन्सारी ,शेख मुजीब जावेद अन्सारी, रजाक सर फौजीया बाजी उपस्थित होते. पोलीस मित्रपरिवार समन्वय समितीचे मराठवाडा अध्यक्ष अहमद भाई अन्सारी, पत्रकार आयुब खान, पत्रकार शेख अजहर हादगावकर, पत्रकार तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रेनाखळी उद्धव इंगळे यांच्या उपस्थितीत मसरत मॅडम यांना शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
केंद्रप्रमुख लोहट सर यांनी उर्दू भाषेचा व मुशायराचा शानदार वापर करीत आपल्या भाषणात श्रीमती खान यांचा गौरव करीत मानवत चा व परभणी जिल्ह्याचा मान उंचावल्याबद्दल अभिनंदन केले . सर्वांनी माझा जो सत्कार केला व अभिनंदन केले याबद्दल याबद्दल श्रीमती मसरत मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून माझ्या या यशात या शाळेच्या सर्व शिक्षकांचे व शाळेतील विद्यार्थ्यांचे सहभाग असल्याचे सांगितले.