चिमुर येथे दहीहंडी कार्यक्रम संपन्न

दहीहंडीचा हा खेळ,खेळाडूंनी सावधगिरीने खेळावे.-खासदार अशोक नेते
मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
स्वर्गीय गोटूलालजी व स्वर्गीय धापुदेवी भांगडिया यांच्या स्मृति प्रित्यर्थ – भांगडिया फाउंडेशन च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त क्रांतीभुमी चिमुर येथे भव्य दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना दहीहंडी हा उत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सतत अकरा वर्षाची परंपरा बंटिभाऊनी मोठया उत्साहाने, आनंदाने, बालगोपाल, युवकवर्ग व नागरिकांचा मोठया संख्येने सहभाग घेऊन दहीहंडी हा उत्सव साजरा करतात. पण दहीहंडी उत्सवाचा खेळ हा इतर खेळांपेक्षा हा वेगळा खेळ आहे,एकमेकांच्या सहाय्याने खेळ खेळला जातो. हा खेळ खेळतांना पाण्याचा वर्षाव केला जातो त्यामुळे जोखमीचा खेळ आहे. यासाठी सावधगिरीने खेळ खेळावे.हया खेळात खेळाडूंना फार मोठ्या प्रमाणात इजा व दुखापत सुद्धा होते.याकरिता मान.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारच्या काळात जखमींना दहा लक्ष रुपयांचा विमा कवच ची घोषणा केलेली आहे.तरीपण दहीहंडी हा खेळ खेळतांना खेळाडूंनी , जोखीमदारीने, सावधगिरीने,खेळ खेळावे,असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी केले.
यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या.
दहीहंडी उत्सव मंचावरील प्रमुख्यांसह, बालगोपाल़ांसह गोविंदा- गोंविदा..हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की…
म्हणत आनंदोत्सवात दणाणून गेले.
याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, चिमूरचे लोकप्रिय आमदार बंटिभाऊ ऊर्फ किर्तीकुमार भांगडिया,मराठी सिनेतारका अमृता खानविलकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ देवतळे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्यामजी हटवादे, अल्पसंख्यांक भाजपा आघाडीचे जुनेद खान, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत जी वारजूरकर, तालुकाध्यक्ष राजु पा.झाडे,महिला तालुकाध्यक्षा मायाताई ननावरे,माजी जि.प सदस्या ममताताई डुकरे,महिला मोर्चा चे महामंत्री वर्षा शेंडे, माजी सरपंच दुर्गाताई चावरे,तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे सदस्य व मोठ्या संख्येने युवकवर्ग, बालगोपाल,नागरिक उपस्थितीत होते.