ताज्या घडामोडी

राजूरा उपविभाग पटवारी संघटनेच्या अध्यक्षपदी किशोर कुलकर तर उपाध्यक्षपदी सुनिल रामटेकेंची अविरोध निवड

पटवारी संघटनेच्या अनेक सदस्यांनी केले त्यांचे अभिनंदन

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

विदर्भ पटवारी संघ, नागपूर, उप-विभाग शाखा राजूराची वार्षिक आमसभा नुकतीच
पटवारी भवन राजूरा येथे किशोर कुलकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
या आमसभेला प्रमुख पाहुणे म्हणून वि. प. संघ, जिल्हा शाखा, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सुर्वे, उपाध्यक्ष धनराज पारसे, सुनील चौधरी, धनराज बुराडे, दिगांबर गेडाम, किशोर उईके, उपस्थित होते .यावेळी
राजूरा उप-विभागाच्या नविन कार्यकारणीची अविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी किशोर एस. कुलकर तर उपाध्यक्षपदी सुनिल रामटेके यांची नियुक्ती करण्यात आली.या शिवाय सचिव म्हणून लक्ष्मीकांत मासीरकर सहसचिव म्हणून परवेझ शेख
कोषाध्यक्षपदी दामोधर शेंडे यांची नियुक्ती करण्यात आली.
सदस्य म्हणून किशोर उईके, प्रकाश कमलवार, सागर कोडापे, प्रविण गंधमवार, विलास चिने, दिगांबर वडस्कर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन सागर कोडापे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार किशोर उईके यांनी मानले. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या आमसभेला राजूरा उपविभातील राजूरा, कोरपना व जिवती येथील पटवारी व मंडळ अधिकारी बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते.दरम्यान किशोर कुलकर व उपाध्यक्ष सुनिल रामटेके यांच्या निवडीचे पटवारी विल्सन नांदेकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close