पोलीस मिञ परिवार समन्वय समिती भातकुली तालुका तर्फे “आधार फासे पारधी संस्थेस” धान्य देऊन दिला आधार
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
अमरावती येथील आधार फासेपारधी संस्थेच्या अध्यक्षा नीलिमा ताई पवार ह्या गरिब,निराधार पारध्यांच्या मुलांना व काही गुन्हेगारी क्षेत्रात काम करतात अशा मुलांना गुन्हेगारी क्षेत्रातून वळून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम निलिमाताई पवार बऱ्याच दिवसापासुन करीत आहे.
राजुरा येथील पारधी बेढ्यातील गरिब,निराधार मुलांना एकत्र करून त्यांना शिकवण्याचे व माणुसकीचे धडे देत आहेत सोबतच मुलांना मध्यांतरी जेवण पण देतात.काल त्यांचा पोलीस मिञ परिवार समन्वय समिती अमरावती पदधिकाऱ्यांना फोन आला की माझ्या मुलांना जेवण करता काहीच धान्य नाही करिता आपण आम्हास तातडीने मदत करावी.याची पोलीस मिञ परिवार समन्वय समिती अमरावती पदधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन तातडीने पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे भातकुली तालुका अध्यक्ष कुंदनजी गजभिये यांनी आपल्या मुलांचा जन्मदिवस साजरा न करता त्या गरिब,निराधार मुलांना भोजनाच्या व्यवस्थेसाठी या मुलांकरिता धान्य भेट दिले.या कार्यक्रमाला प्रदेश सल्लागार सुभाष जी सोळंके साहेब,अमरावती विभागिय प्रमुख मनीषजी गुडदे साहेब,अमरावती जिल्हा अध्यक्ष कैलासजी विंचुरकर,अमरावती जिल्हा महासचिव राजेंद्र तांबेकर,व भातकुली तालुका अध्यक्ष कुंदनजी गजभिये यांच्या प्रमुख आधार फासेपारधी या संस्थेस धान्य भेट दिले.याप्रसंगी प्रदेश सल्लागार सुभाषजी सोळंके साहेबांनी आपल्या संस्थेस केव्हाही,काहिही अडचण आल्यास व मदत लागल्यास पोलीस मित्र परिवार समन्वय समिती च्या पदधिकाऱ्यांशी संपर्क करावा पोलीस मिञ परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील असे मनोगत व्यक्त केले.आधार फासेपारधी संस्थेच्या सर्वश्री निलिमा ताई पवार यांनी समितीच्या पदधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.समितीने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरुन कैतुक केले जात आहे.