ताज्या घडामोडी

सोनपेठातील मीरा वाडकर निसर्ग मित्र पुरस्काराने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 24 एप्रिल 2022 वार रविवार रोजी भारत की आजादी के अमृत महोत्सव के उपलक्ष मे पंच उत्सव तीन दिवसीय भव्य कार्यक्रम जिल्हा नांदेड तालुका अर्धापूर येथील कोंडा गावी संपन्न झाला जन्मभूमी वडगाव सिद्धेश्वर व कर्मभूमी सोनपेठ या ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक सेवेसाठी आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्व तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय ब्रह्मा कुमारी मीरा दीदी सोनपेठ सेंट्र इन्चार्ज तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था सोनपेठ तालुका महिला अध्यक्ष यांना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवाचा विकास संस्था भारत या संस्थेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, पर्यावरण जन जागृती विषयी अशा विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय वाखाणण्याजोगे समज हितवादी कार्याची नोंद घेऊन राज्यस्तरीय निसर्ग मित्र 2022 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . सन्माननीय मान्यवर राज योगिनी ब्रह्मा कुमारी सुनंदा दीदी जी मीरा सोसायटी सब्झोन इंचार्ज पुणे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह मेडल व प्रशस्तीपत्र देऊन तसेच , उपस्थित सन्माननीय मान्यवर ब्रह्माकुमारी उषा दिदी इन्चार्ज मीरा सोसायटी पुणे , बी. के. स्वाती दीदी नांदेड , बी. के. शिवकन्या दीदी नांदेड , बी. के. नंदा दीदी लातूर ,बी. के. दत्तात्रय भाई शांतीवन माउंट अबू महामंडलेश्वर स्वामी राघवानंद जी महाराज कर्नाटक हरियाणा मध्य प्रदेश , महामंडलेश्वर स्वामी विश्वआनंद जी महाराज राजकोट गुजरात यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. मीरा दीदी यांचे सर्व मान्यवरांनी मन पूर्वक कौतुक करुन अभिनंदन केले व पुढील काळातील पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे अशा समाजहित वादी कार्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल उचलावे असेच अविरत कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .तसेच सुत्राशी बोलताना मीरा दीदी यांनी सांगितले की पर्यावरण संवर्धनाच्या कार्यासाठी आपल्या सर्वांच्या अभिनंदन शुभेच्छा आशीर्वाद सोबत घेऊन हे कार्य करण्यासाठी कायम कटीबद्ध राहिन . निसर्ग नेहमीच सर्व काही विनामूल्य आणि मुबलक देतो झाडे लावू या,, झाडे जग ऊ या …, वन हैं तो जन हैं !!! या भव्य कार्यक्रमासाठी संपूर्ण भारत देशातील गण मान्यवर उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close