ताज्या घडामोडी

आनंद निकेतन महाविद्यालयात विधी साक्षरता शिबिर संपन्न

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा. व्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा व तालुका विधी सेवा समिती वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 29 जुलै 2022 ला रोजी विधी साक्षरता शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जिल्हा न्यायाधीश रा. न. बावनकर सर होते. महिला या पुरुषापेक्षा अनेक बाबतींत सरस असुनही अत्याचाराला बळी पडतात. महिलांनी सक्षम असले पाहिजे व कायद्याचं ज्ञान संपादन करायला पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी मा. आयुष निपानी. सर. SDPO उपविभागीय पोलिस अधिकारी. यांनी मावनी तस्करी बाबत काही उदाहरणे देऊन माहिती दिली कमी वयातील मुल छोट्या छोट्या प्रलोभनांना बळी पडतात. ही प्रलोभने आपल्याला हानी पोहचवणारी आहेत. त्यामुळे त्याबाबत जागृत असावे असे त्यांनी सांगितले.
अँड. भावना लोया. यांनी महीलानसाठी असनारे कायदे यावर मार्गदर्शन केले. पण कायदे आपल्या बाजूने आहेत म्हणून त्याचा गैरवापर होऊ नये असेही त्यांनी प्रतिपादन केले.
अँड. मिलिंद देशपांडे यांनी पोस्को कायदा काय आहेत आणि अल्पवयीन मुलींचं नव्हे तर मुलांचेही शोषण होते त्यावेळी पोस्को कायदा अंतर्गत कार्यवाही होऊ शकते त्यावेळी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. मृणाल काळे. यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शनात मुलींनी स्वतःचे करिअर उत्तम घडविला जास्त लक्ष द्यावे आणि त्या प्रमाणाने वर्तवणूक असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश पवार, तर प्रास्ताविक सौ. सुर्वनारेखाताई पाटील. यांनी तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ.  राधा सवाने. यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close