ताज्या घडामोडी

बोर्डा बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतीय संविधानाचे जनक दिनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणाऱ्या महायोद्धा उपेक्षितांच्या जीवनामध्ये ज्योत पेटविणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वतेचा वापर समाज हितासाठी करणारा पहिला महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे होते.
वरोरा लगत बोर्डा येथील बुद्ध विहारात
बौद्ध समाज बांधवांचे वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे 14 एप्रिल बहारदार आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भीमराव डावंगावकर हे होते तर प्रमुख अतिथी
ग्रा.प.सरपंच ऐश्वर्या खामनकर ह्या होत्या.
प्रमुख पाहुणे ऍड.आदेश अलोने,जगदिश डावंगावकर,ग्रा.प.सदस्या जीवतोडे ताई,कातकरताई,परचाके ताई,माजी सरपंच डोमा तेलंग आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हारार्पन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव डावंगावकर यांचे हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव डावगावकर ,प्रमुख अतिथी सरपंचा ऐश्वर्या खामनकर ,ऍड.आदेश अलोने,जीवतोडे ताई,कातकर ताई या मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.
सरपंचा ऐश्वर्या खामनकर यांनी भाषणाचे शेवटी समाजबांधवांनी संविधान भवन बांधकामासाठी योग्य ती व सर्वानुमते जागा उपलब्ध करून द्यावी.त्याठिकाणी संविधान भवन बांधकामासाठी संबंधित प्रशासनाला पाठपुरावा करण्यास सोयीस्कर जाईल.
संविधान भवन साठी माझे सर्वोत्तपरी प्रयत्न राहील असे बौद्ध समाजबांधवांना
अश्वाशीत केले.
कार्यक्रमाचे शेवटी आनंदवनातील आनंद माध्यमिक विद्यालयात परिचर पदावर असणाऱ्या व गायन स्पर्धेमध्ये ठिकठिकानी सहभाग घेऊन मधुर गायन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि युट्युब वर प्रसिद्धी झोतात असणाऱ्या ज्योति सिह यांनी ‘छाती ठोकून सांगू जगाला असा विद्वान होणार नाही.किती झालास विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही.’ तसेच उमर मे भोली-भाली शेर की झोली हु।जयभीम की बेटी मै तो जयभीमवाली हु। हि दोन गीते गायन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौतम दारुडे,जगदीश डावंगावकर,धनराज रामटेके,लता म्हैसकर,उषाताई अलोने,देवगडे ताई,स्वप्नील पाटील,कुरेकार ताई,जितेंद्र कांबळे,सुजाता खोब्रागडे,पारख डावंगावकर आदिंनी सहकार्य केले
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन
जे.डी.चुनारकर यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close