ताज्या घडामोडी

आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरूच! आंदोलनाचा आजचा 50 दिवस

नागपूरात चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील महिला कर्मचारी दाखल

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

आपल्याला प्रलंबित रास्त मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला बसलेल्या आशा वर्कर व गटप्रवर्तकांच्या आंदोलनाचा आजचा 50 वा दिवस असल्याचे आयटकचे दिग्गज नेते काॅ.रविन्द्र उमाठे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.मुंबईतही गेल्या तीन आठवड्यापासून आशा व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरू असून शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही.त्यामुळे महिला कर्मचारी वर्गात शासनाविषयी आक्रोश वाढत चाललेला आहे.दरम्यान आज नागपुरात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील शेकडों महिला कर्मचारी नागपूरला पोहचल्या असल्याचे नागपूर वरुन पोर्णिमा कीर्तीवार यांनी संध्याकाळी भ्रमणध्वनीवरून या प्रतिनिधीस सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close