तालुका विधी सेवा समिती वरोरा द्वारा बाल स्नेही कायदेशीर सेवा आणि संरक्षण योजना कार्यशाळा संपन्न
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
बालक दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 14नोव्हेंबर 2022 रोज सोमवारला हिरालाल लोया विद्यालय वरोरा येथे ठीक 1:00 वाजता तालुका विधी सेवा समिती वरोरा अंतर्गत मा. र .मा.बावनकार जि.न्यायाधीश-१तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांचे अध्यक्षतेखालील तसेच मा.संदीप गोडशलवार ग.वि.अ.तसेच मा.जयंत धात्रक सहाय्यक ग.वि.अ.पं.स.वरोरा,मा. पी .एन .रोकडे (सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर वरोरा) ,मा.डी. वि.चहारे ग.शि.अ.यांचे प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना बालस्नेही कायदेशीर सेवा आणि त्यांच्या संरक्षण योजना,(Child Friendly Legal Services to Children&their protection Scheme)यासंदर्भात मा. बावनकर साहेब, गोडशलवार साहेब आणि रोकडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी तथा विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.