येत्या ६ ऑगस्टला प्रा. नितेश कराळे वरोऱ्यात
विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा तसेच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ ऑगस्टला स.११वाजता राधा मिलन सभागृह बोर्डा (वरोरा) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आयोजित कार्यक्रमाला प्रामुख्याने वऱ्हाडी भाषेतील महाराष्ट्रातील वर्धाचे प्रसिद्ध वक्ते प्रा.नितेश कराळे यांचे स्पर्धा परीक्षा बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. या शिवाय इयत्ता १०व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , ctv वरोरा लोकल चॅनेलचे उद्घाटन व उन्माद विषमतेचा या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे .सदरहु कार्यक्रमाचे उद्घाटन वरोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांच्या हस्ते होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन हे विभूषित करणार आहेत .तर विशेष अतिथी म्हणून परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्या डॉ .अभिलाषा गावतुरे ,ॲड .पुरुषोत्तम सातपुते प्रकाश बाबू मुथा ,धनराज आस्वले ,सुषमाताई शिंदे ,जेष्ठ कवयित्री शोभा वेले ,सुधाकर कडू यांची उपस्थिती राहणार आहे .सदरहु कार्यक्रमाला मोठ्या संख्येंने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अशफाक शेख , सुनिल शिरसाट, संजय तोगट्टीवार हितेश राजनहिरे , अमर गोंडाने, मुजाहिद कुरेशी ,फैज पटेल, विश्वदीप गोंडाने ,अजीम शेख, अहेफाज शेख यांनी केले आहे.