वरोरा शहरातील जनतेच्या पाणी प्रश्नावर मनसेने केले मडकी फोड आंदोलन
शहरातील जनतेला साधे पिण्याचे शुद्ध पाणी देऊ शकत नसेल तर हे कसले राजकारण? मनसेचा सवाल.
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
मागील अनेक वर्षा पासून वरोरा शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यास नगरपरिषद प्रशासन व तेथील सत्ताधारी कमी पडले असून लोकप्रतिनिधी यानी सुद्धा या शहरातील जनतेच्या ज्वलंत पाणी प्रश्नावर केवळ राजकारण केले आहे. दरम्यान आता शहरातील नागरिकांना फ्लोराईड युक्त व क्षारयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते रमेश राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली
मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या नेतृत्वात दिनांक 25 ओक्टोंबर ला दुपारी 1.00 वाजता मडके फोड आंदोलन नगरपरिषद कार्यालयासमोर करून सत्ताधारी पक्षाचा व मौन धारण करणाऱ्या विरोधी नगरसेवकांचा निषेध केला.
वरोरा नगरपरिषद मध्ये जे सत्ताधारी आहे त्यानी शहरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या याचा आढावा मुख्याधिकारी यांच्याकडून घेण्यात आला असता केवळ तात्पुरती उपाययोजना त्यांच्याकडे आहे तरीही व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही.नगरपरिषद प्रशासनाने 65 कोटी रुपयाची पाणी पुरवठा तयार केली ती धूळ खात असून ट्यूबवेल द्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याचे परीक्षण न करता ते सरळ शहरातील नागरिकांना पुरवठा करण्यात येत आहे याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मडके घेऊन नगरपरिषद गेट समोर फोडून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे,जिल्हा सचिव विनोद सोनटक्के,तालुका अध्यक्ष वैभव डहाने,राहुल खारकर, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी,तालुका सचिव कल्पक ढोरे ,शहर अध्यक्ष राहुल लोणारे , शहर उपाध्यक्ष कुणाल गौरकार , शहर उपाध्यक्ष श्रीकांत तळवेकर, तालुका उपाध्यक्ष मनवीसे अभिजित अष्टकार,तालुका उपाध्यक्ष गणेश खडसे , प्रसिद्धी प्रमुख विकी येरणे,मनसैनिक रोहित पिंपळशेंडे, मनसैनिक आदित्य डवरे ,मनसैनिक गवशा गबाडे,मनसैनिक राजुभाऊ नवघरे ,गेडाम इत्यादींची उपस्थिती होती.